Skip to content

15. आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय पाचवी | aaplya Samsya- aaple Upay

  • by
आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय

आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय : वाढती वाहन संख्या व त्यामुळे वाढत जाणारे प्रदूषण, वाहतुकीची कोंडी, ओला कचरा – सुका कचरा यांची वाढणारी समस्या त्याचबरोबर वाढणारा इ-कचरा इत्यादी समस्यांची जाणीव करून देणे व जागृती निर्माण करण्यासाठी हा पाठ खूप फायदेशीर आहे. आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत.

आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय

प्रश्न १) तुमच्या शब्दात उत्तर लिहा.

१) तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का?

उत्तर- हो. गेलो आहे.

२) रस्त्यावर कोणत्या वेळी जास्त गर्दी असते?

उत्तर- रस्त्यावर सकाळी ९ ते ११ व संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत जास्त गर्दी असते.

३) नेमक्या त्या वेळेलाच गर्दी का होते?

उत्तर- कारण यावेळी सर्व लोक कामासाठी, ऑफिससाठी बाहेर पडतात. त्याचबरोबर सर्व मुलांची शाळा भरण्याची व सुटण्याची वेळी याच दरम्यान असते.

४) वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात?

उत्तर- वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या समस्या …

  • वाहतूक कोंडीमुळे प्रवासास वेळ लागतो.
  • वायू प्रदूषण वाढते.
  • माणसांना चालण्यास अडचण होते.
  • कर्कश हॉर्न मुळे ध्वनी प्रदूषण होते.
  • इंधनाचा वापर वाढतो. त्यामुळे आर्थिक खर्च वाढतो.

५) वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते?

उत्तर- वाहतूक कोंडीमुळे ध्वनी प्रदूषण व वायु प्रदूषण वाढते.

६) हे प्रदूषण कमी व्हावे यासाठी काय करता येईल?

  • खाजगी वाहन ऐवजी शक्य तेव्हा सार्वजनिक वाहनाचा वापर करणे.
  • जवळच्या प्रवासासाठी वाहन न वापरता सायकल किंवा चालत जावे.
  • वाहनाची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी.
  • गर्दीच्या वेळी सार्वजनिक वाहनाचा वापर करावा.

शिष्यवृत्ती परीक्षा सराव पाचवी

प्र २) खालील वाक्य वाचा. तुम्हाला योग्य वाटत असेल तर बरोबर अशी खूण करा आणि अयोग्य वाटत असेल तर चूक अशी खूण करा.

आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय

१) एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे. तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे. – चूक

२) ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास, भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे. – चूक

३) दुकानात वस्तू आणायला गेल्यावर, आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे. बरोबर

४) गर्दीतून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे. चूक

प्र.३) तुमच्या मनाने उत्तर सांगा.

आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय

अ) आपण कचरा कशाला म्हणतो?

टाकाऊ वस्तूंना व वापरास योग्य नसणाऱ्या वस्तूंना कचरा म्हणतात.

आ) घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात?

भाज्यांचे देठ, शिल्लक अन्न, खराब अन्न, फळांची टरफले व टाकाऊ पदार्थ इत्यादी ओला कचरा असतो. कागदाचे तुकडे, धूळ, केस, औषधाच्या बाटल्या, कपड्याचे तुकडे इत्यादी प्रकारचा सुका कचरा घरात असतो.

इ) तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा.

उत्तर – भाज्यांचे देठ, शिल्लक अन्न, खराब अन्न, फळांची टरफले व टाकाऊ पदार्थ इत्यादी ओला कचरा असतो. कागदाचे तुकडे, धूळ, केस, औषधाच्या बाटल्या, कपड्याचे तुकडे इत्यादी प्रकारचा सुका कचरा घरात असतो.

) तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावतात ते सांगा.

उत्तर – आम्ही आमच्या घरातील ओला कचरा खत तयार करण्यासाठी शेणकीत टाकतो.

उ) कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टीवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात?

कचऱ्यातील ओल्या कचऱ्यापासून खत व बायोगॅस तयार करता येईल. सुक्या कचऱ्यापासून इंधन अथवा त्याचा पुनर्वापर करता येईल.

ऊ) तुमच्या वर्गातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात?

उत्तर- वर्गातील कचऱ्यात कागदाचे तुकडे, धूळ, पेन्सिलीचे तुकडे, मोडलेली पट्टी, पुठ्ठे, खडूचे तुकडे इत्यादी वस्तू असतात.

ए) वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल?

कचरा कचरा पेटीत टाकावा. वह्यांची कागदी फाडू नयेत. जेवताना अण्णा खाली सांडू देणार नाही. पेन्सिलला टोक केलेला कचरा कचराकुंडीत टाकीन.

आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय मधील प्रश्न उत्तरे ही मुक्त उत्तरे स्वरुपाची असल्याने त्यामध्ये आपल्या परिस्थिती नुसार बदल करता येईल.

इयत्ता पाचवी सर्व विषयांचे स्वाध्याय सोडवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *