बादशहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय : जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून छत्रपती शिवाजी महाराज बादशहाच्या भेटीस आग्र्यास गेले. बादशहाच्या दरबारात बादशहाने शिवाजी महाराजांना आपल्या मागील रांगेत उभे केल्याने शिवाजी महाराज रागाने महालाबाहेर पडले.
शिवाजी महाराज त्यांच्या मुक्कामी गेल्यानंतर औरंगजेबाने त्यांच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला. शिवाजी महाराजांना बादशहाने कैद करून ठेवले.
या कैदेतून सुटण्यासाठी शिवाजी महाराजांनी आजारी पडल्याचे सोंग घेतले. आजारातून बरे व्हावे म्हणून मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला सर्व पेटारे उघडून तपासून बाहेर पाठवले जात होते. मात्र कालांतराने पेटारे तपासण्याचे बंद झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघेही वेगवेगळ्या पेटार्यात बसून औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर पडले.
या ठिकाणी आपण बादशहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय अभ्यासणार आहोत.
बादशहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय
प्र. १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
अ) शिवराय बादशहाच्या दरबारास गेले, त्यादिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता.
(पन्नासावा, चाळीसावा, साठावा)
आ) आग्र्याहून येताना संभाजी राजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.
(झाशीत, मथुरेत, दिल्लीत)
प्र. २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) आग्र्याचा जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला?
उत्तर- आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला.
आ) आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले?
उत्तर – आग्र्याच्या कैदेत शिवाजी महाराजांबरोबर संभाजी राजे, हिरोजी फर्जद व मदारी मेहतर राहिले.
इ) आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले?
उत्तर – आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली.
प्रश्न ३) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा. बादशहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय
१) शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले?
उत्तर – जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाहाच्या भेटीस आग्र्याला गेले. बादशहाचा वाढदिवस असल्याने दरबारात निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. यावेळी बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. मराठ्यांना पाठ दाखवून अनेक वेळा पळालेला जयसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता.
आपण महाराष्ट्राचे राजे असूनही आपल्याला पहिल्या रांगेत उभे राहण्याचा मान न मिळाल्याने शिवरायांना राग आला. हा अपमान त्यांना सहन झाला नाही म्हणून रागारागाने शिवराय महालाबाहेर पडले.
२) शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली?
उत्तर – बादशहाच्या भेटीस गेल्यानंतर शिवाजी महाराजांना बादशहाने कैदेत ठेवले. कैदेत शिवरायांनी आजारी असल्याचे सोंग केले. आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेठारे पाठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पहारेकरी हे पेटारे तपासून मगच बाहेर सोडत असेल. पण पुढे हळूहळू पहारेकरी पेटारे न तपासताच पाठवू लागले. ही संधी पाहून एका दिवशी शिवराय व संभाजी राजे पेटाऱ्यातून बाहेर गेले. अशाप्रकारे शिवरायांनी आपली सुटका करून घेतली.