Skip to content

13. थोडं ‘आ’ भारनियमन करूया स्वाध्याय नववी

  • by
थोडं 'आ' भारनियमन करूया स्वाध्याय

थोडं ‘आ’ भारनियमन करूया : या पाठाच्या लेखिका आहेत मंगला गोडबोले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो याचा प्रत्यय करून देणारा हा पाठ आहे. लेखिका यांनी या पाठांमध्ये आभार मानण्याच्या निरनिराळी पद्धती, त्यामुळे आभारामध्ये वाढणारी औपचारिकता यांची जाणीव करून दिली आहे. थोडं ‘आ’ भारनियमन करूया या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत.

थोडं ‘आ’ भारनियमन करूया स्वाध्याय

प्रश्न १) काय करावे, ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास – कृतीत सहजासहजी उतरतो.

आ) खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास – उभयपक्षी अवघडलेपणा येतो. नात्यातील गहरेपणा कमी होऊन औपचारिकता उरते.

इ) मित्र- मैत्रिणीनी आभार मानल्यास – आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि जादापणा शहाणपणा केल्यास याद राख अशी धमकीही मिळते.

ई) लेखिकेच्या मते ‘आ ‘ भारनियमन केल्यास – त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही.

प्रश्न २) थोडं ‘आ’ भारनियमन करूया पाठातील उदाहरणे शोधा.

शब्दांशिवाय मानलेले आभार –

स्पर्शाने – ऑपरेशनच्या गुंतीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरचे हात घट्ट धरतो.

कटाक्षाने – आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्र-मैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष.

प्रश्न 3) चूक की बरोबर ते ओळखा.

अ) आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसे अनेकदा गल्लत करतात.

बरोबर

आ) भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.

उत्तर – चूक

इ) मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.

उत्तर – बरोबर

ई) आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.

उत्तर – बरोबर

प्रश्न ५) कारणे लिहा.

आकाशवाणी वरील आभार प्रदर्शनाची कारणे –

  • गाणे कळवले.
  • हवे ते गाणे ऐकवले.
  • पत्राची दखल घेतली.
  • आभाराचे पत्र पाठवले.

प्रश्न ५)थोडं ‘आ’ भारनियमन करूया पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्य शोधा.

उत्तर – १) साधं घोटभर पेय दिले तरी हात भर थँक्यू म्हणतात.

२) थँक्यू म्हणता येणे हा संस्कृतपणाचा कडेलोट आहे, असं काही काळ वाटून गेलं.

३) तू कसली ग माझी थँक्यू ? मिस तुझी थँक्यू.

४) त्याला थँक्यू दिलेस का पण ?

५) तुला किती थँक्यू केलं तरी कमीच.

६) जन्मल्या जन्मल्या आई बापांचे आभार मानणारे कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याशी नीट वर पोहोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही.

८) शस्त्रक्रियेसाठी दाबून फी घेणाऱ्या तज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच म्हणजे खरा तर नको तो कापून काढला आणि वर चाकू सुरी कात्री खुणेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही तर त्याचे आठवणीने आभार मानायला नकोत ?

प्रश्न ६) खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

१) कॅप्शन -घोषवाक्य

२) टेन्शन – ताणतणाव

३) आर्किटेक्ट – वास्तुविशारद

४) ऑपरेशन – शस्त्रक्रिया

प्रश्न ७) खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.

१) सुसंस्कृतपणाचा कडेलोट

उत्तर – शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत, असे मानणारे खूप लोक आहेत. इंग्रज म्हणजे संस्कृतच. ते जे जे करतात ते सर्व सुसंस्कृतपणाचे लक्षणच होय असे या लोकांना वाटते. इंग्रज लोक उटता बसता थँक्यू म्हणतात. म्हणून त्यांचे आंधळे अनुकरण करणारे ही सतत थँक्यू म्हणतात. हा सर्व भाव सुसंस्कृतपणाचा कडेलोटच या शब्दातून व्यक्त होतो.

२) घाऊक आभार

उत्तर – एखाद्या कार्यक्रमांमध्ये अनेक व्यक्तींचे व्यक्तिशः आभार मानतात त्या सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजे घाऊक आभार मानणे होय.

प्रश्न ८) स्वमत.

अ) आभार मानणे या शिष्टाचार याविषयीचे तुमचे मत लिहा.

उत्तर – एखादे काम करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये अनेक लोकांचे हातभार लागलेले कोणत्याही काम फक्त एकट्यानेच करता येत नाही. त्या कामाचे श्रेय आपल्याला मिळते. त्याचे फायदे आपल्याला मिळतात. वास्तविक आपल्याला एकट्याचा तो अधिकार नसतो. मिळालेल्या यशामध्ये आपले यश असले तरी त्यामध्ये अनेक वाटेकरी असतात म्हणून इतरांच्या सहकार्याची परतफेड आपण काही करू शकत नाही. म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रकार आहे. सध्या मात्र आभार व्यक्त करण्याची औपचारिकता पाहायला मिळते. आभार व्यक्त करणे हे त्याच्या कृतीतून दिसायला हवे मात्र ते कोरड्या शब्दातून व्यक्त होताना पाहावयास मिळतात. असे होते तेव्हा आभाराचे मूळ उद्देश नष्ट होतो म्हणून आभार मानताना तारतम्य बाळगले पाहिजे. मुख्य म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे व नम्रतेने आभार मानले पाहिजेत; असे मला वाटते.

आ) पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात लिहा.

उत्तर – भारनियन हा शब्द विजेचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर सक्तीने विजेची काटकसर करण्यासाठी केलेली वीज कपात होय. मात्र या वीज कपातीत आपल्याला भेदभाव आढळतो. विज कपाती प्रामुख्याने ग्रामीण भागात केली जाते शहरी भागात मात्र वीज सदैव झाला असते. वीज कपातीमुळे ग्रामीण जीवन विस्कळीत होऊन शेतकऱ्यांचे ही खूप हाल होतात. असे असतानाही त्याला भारनियमन हे गोंडस नाव दिले जाते.

त्याचप्रमाणे आभार व्यक्त करण्याच्या नादात त्यामध्ये कृत्रिमपणा येऊन त्याचे महत्त्व कमी झालेले पहावयास मिळते. फक्त औपचारिकता म्हणून मानलेले आभार काही फायद्याचे नाहीत. त्यापेक्षा आपल्या स्पर्शाने अथवा नजरेने व्यक्त केली कृतज्ञता श्रेष्ठ ठरते अशा प्रकारचा संदेश देणारा आहे हा पाठ आहे.

वीज पुरवठा सुरू विविध ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे भारनियमनाची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे आभाराचे मूल्य आणि महत्त्व राखून ठेवण्यासाठी आभार नियमनाची आवश्यकता आहे. अशा प्रकारचे निर्देश देणारे या पाठाचे शीर्षक आहे.

13. थोडं ‘आ’ भारनियमन करूया स्वाध्याय नववी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *