Skip to content

शिवरायांचे बालपण स्वाध्याय इयत्ता चौथी

  • by
शिवरायांचे बालपण स्वाध्याय

१. रिकाम्या कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ ) शिवरायांचा जन्म ……….. किल्ल्यावर झाला.

( पुरंदर, शिवनेरी, पन्हाळा )

उत्तर- शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

आ) आदिलशाहाने शहाजीराजांची ………… प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली.

( कर्नाटकातील, खानदेशातील, कोकणातील )

उत्तर- आदिलशाहाने शहाजीराजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली.

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले ?

जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात आपणही मोठे झाल्यावर शूर पुरुषासारखे पराक्रम करावे, असे विचार घोळू लागले.

आ ) शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत ?

शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव , चेंडू , भोवरा हे खेळ खेळत असत.

इ ) शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला ?

निजामशाहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली, म्हणून शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला.

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत ?

जिजाबाई शिवरायांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या व अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. महाराष्ट्रातील थोर साधुसंतांच्या चरित्रांतील गोष्टी सांगतअसत. अनेक शूर पराक्रमी पुरुषांच्या गोष्टी सांगत असत.

आ ) शहाजीराजांनी निजामशाहाच्या वंशातील मुलाला निजामशाहा म्हणून जाहीर का केले ?

वजीर फत्तेखानने निजामशाहाचीच हत्या केली त्यामुळे त्याचे बक्षीस म्हणून मुघल बादशाहाने फत्तेखानास शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूख परस्पर देऊन टाकला. फत्तेखानास व मुघल बादशाहास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामशाहाच्या वंशातील मुलाला निजामशाहा म्हणून जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *