शर्थीने खिंड लढवली : इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील शर्थीने खिंड लढवली हा पाठ सिद्धी जोहारने पन्हाळ्याला वेढा दिल्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडावर जाताना घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी केलेल्या पराक्रमाचे वर्णन आहे. शिवराय विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या निवडक सैन्यासह घोडखिंड लढवली. तोफांचे आवाज ऐकताच, स्वामिभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. म्हणून या खिंडीला पावनखिंड नाव दिले. इथे आपण शर्थीने खिंड लढवली पठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत.
शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय
प्रश्न १. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
१) सिद्दी जौहरने पन्हाळगडाला गडाला चौफेर वेढा घातला.
२) बाजीप्रभूची स्वामिभक्ती बघून शिवराय गहिवरले.
3) घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली.
प्रश्न २) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढयातून सुटका करून घेण्यासाठी सिद्दीला कोणता निरोप पाठवला ?
उत्तर – शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढयातून सुटका करून घेण्यासाठी ‘लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो‘, असा निरोप सिद्दीला पाठवला.
३) सिद्दी जौहर का चवताळला?
उत्तर – शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढयातून निसटल्याचे लक्षात येताच, सिद्दी जौहर चवताळला.
३) विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले?
उत्तर – विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले की , “आम्ही गडावर जातो, तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील; मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या.”
प्रश्न ३) दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली?
उत्तर: शिवरायांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीकडून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार, एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार. अशी युक्ती पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी योजली होती.
आ) बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली?
उत्तर: बाजीप्रभू खिंडीच्या तोंडाशी हातात तलवार घेऊन उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पडल्या. त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड-गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार केली अशी योजना बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी आखली.
आनंदाचे झाड स्वाध्याय इयत्ता 4 थी
प्र. ४) शर्थीने खिंड लढवली पाठच्या आधारे कारणे लिहा.
१) आदिलशाहा भयंकर चिडला.
उत्तर – विजापूर दरबारातील बलाढय सरदार अफजलखान याचा शिवरायांनी वध केला होता. त्यामागोमाग त्यांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे विजापूरचा सुलतान आदिलशाहा भयंकर चिडला.
२) शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशिद अमर झाला.
उत्तर – शिवरायांप्रमाणे दिसणाऱ्या शिवा काशिदाची पालखी शिवरायांची आहे, असे समजून शत्रूच्या सैनिकांनी ती सिद्दी जौहरच्या छावणीत नेली. तोपर्यंत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. इकडे थोडया वेळाने सोंग घेतलेल्या शिवाजीचे सोंग उघडकीस आल्यावर सिद्दीने त्याला ठार मारले. अशा रितीने शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेतील शिवा काशीद अमर झाला.
३) पावनखिंड इतिहासात अमर झाली.
उत्तर -स्वामिभक्त बाजीप्रभूने घोडखिंड अखेरपर्यंत लढवली. शिवराय गडावर पोहोचण्याची खूण म्हणून केलेल्या तोफांचे आवाज कानी पडल्यावरच बाजीप्रभूंनी आपला प्राण सोडला. अशा प्रकारे स्वामिभक्ताच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली; त्यामुळे घोडखिंड पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली.
शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय