Skip to content

वस्त्र स्वाध्याय इयत्ता 4 थी | Vastra swadyay

  • by
वस्त्र स्वाध्याय

वस्त्र स्वाध्याय : इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास पाठ्यपुस्तकात वस्त्र हा घटक आहे. यामध्ये कापड कोणकोणत्या पदार्थापासून तयार होते? जुन्या कापड्यांचा उपयोग कशाप्रकारे करता येईल? व भारतामध्ये निरनिराळ्या भागामध्ये केल्या जाणाऱ्या पोशाखांची माहिती विद्यार्थ्यांना या पाठांमध्ये करून देण्यात आली आहे. या ठिकाणी आपण वस्त्र स्वाध्याय, पाठातील प्रश्न व त्यांची उत्तरे अभ्यासणार आहोत.

वस्त्र स्वाध्याय

वस्त्र पाठातील प्रश्न

  1. तुम्ही घातलेले कपडे कशाने स्वच्छ होतात?

उत्तर – कपडे घातल्यानंतर धुळीने, घामाने, काम केल्याने व कपडे वापरल्याने अस्वच्छ होतात. जास्त दिवस उघड्यावर ठेवल्याने कपडे अस्वच्छ होतात. अंगावरती अन्नपदार्थ सांडल्याने, खेळताना माती लागल्याने कपडे अस्वच्छ होतात.

2. आपल्या घरात कशाने कपडे धुतात?

उत्तर – आपल्या घरात डिटर्जंट पावडर, साबण व ब्रश यांच्या साह्याने कपडे धुतात.

3. धुलाई केंद्रात कपडे धुताना काय वापरतात?

उत्तर -धुलाई केंद्रात डिटर्जंट, साबण आणि इतर रसायने वापरून कपडे धुतात.

4. किराणा मालाच्या दुकानात कोणकोणत्या प्रकारचे धुण्याचे साबण असतात?

उत्तर -किराणा मालाच्या दुकानात साबणाच्या वड्या, डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप इत्यादी स्वरूपात धुण्याचे साबण असतात.

5. तुम्ही पहिलीत असताना चे कपडे आता वापरता का?

उत्तर – नाही.

6. वापरत नसल्यास, कोणते कपडे तुम्ही आता वापरता?

उत्तर -आता शरीरावर योग्य रित्या बसणाऱ्या मापाचे कपडे आम्ही वापरतो.

7. पूर्वीचे कपडे आता न वापरण्याचे कारण काय?

उत्तर -पूर्वीचे कपडे आता लहान होऊ लागले आहेत. काही कपडे फाटले व काही खराब झाले त्यामुळे ते वापरता येत नाही.

8. लहान असताना तुम्हाला अत्यंत आवडलेला एखादा ड्रेस तुम्ही आता का वापरू शकत नाही?

उत्तर – तो ड्रेस आकाराने लहान असल्याने आता बसत नाही. म्हणून आता वापरू शकत नाही.

9. तुम्ही वापरत नसलेल्या कपड्यांचे काय होते?

उत्तर – काही चांगले कपडे गरजू लोकांना दिले जातात. काही कपड्यांचा पुनर्वापर करून इतर वस्त्रे बनवली जातात. जसे- गोधडी, पाय पुसणी इत्यादी.

छोटे आजार घरगुती उपचार स्वाध्याय इयत्ता चौथी

वस्त्र स्वाध्याय

अ) खालील तक्त्यातील शब्द योग्य प्रकारे जोडून लिहा.

मेंढीसूतपोत
कापूसधागास्वेटर
तागलोकरकापड
वस्त्र स्वाध्याय

उत्तर- 1. कापूस- सूत- कापड 2. मेंढी- लोकर- स्वेटर 3. ताग- धागा- पोते

आ) चित्रातील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात?

वस्त्र स्वाध्याय

उत्तर- साबण आणि डिटर्जंट पावडर वापरतात.

इ) कोणती व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते?

उत्तर- बोहारीन

) अर्जुनच्या अंगाला आज खूप खाज येत आहे. त्याने काय करायला हवे? योग्य गट शोधा.

अ) स्वच्छ आंघोळ करणे. अत्तर लावणे. कपडे बदलणे.
आ) स्वच्छ आंघोळ करणे. कपडे बदलणे. राख लावणे.

इ) स्वच्छ आंघोळ करणे. स्वच्छ कपडे घलणे. औषधोपचार करणे.

उत्तर – क) स्वच्छ आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे व औषधोपचार करणे.

उ. हवामानानुसार कपड्यांमध्ये कोणते बदल आपण करतो? चार वाक्य लिहा.

उत्तर- १) थंडीच्या दिवसात लोकरी कपडे, स्वेटर, कानटोपी, जाड कपडे यांचा वापर केला जातो. २) उन्हाळ्यामध्ये सुती कपडे, डोक्यावर टोपी असा बदल करतो. फिकट रंगाचे कपडे वापरतात. ३) पावसाळ्यामध्ये छत्री, रेनकोट याचबरोबर उबदार कपडे वापरली जातात.

ए. मेंढीच्या केसापासून आपल्याला लोकर मिळते. आणखी कोणता प्राणी आहे, ज्याच्या धाग्यापासून आपल्याला तलम कपड बनवता येते?

उत्तर- रेशीम किडा यापासून रेशीम कापड मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *