मिठाचा शोध स्वाध्याय : मिठाचा शोध हा पाठ इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील चौदावा पाठ आहे. या पाठांमध्ये दिलेली कथा हे काल्पनिक आहे. लेखकाने मिठाचा शोध कसा लागला याबाबत कथात्मक पद्धतीने मांडणी केलेली आहे. मिठाबरोबर सैंधव मिठाची ही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली आहे. या ठिकाणी आपण मिठाचा शोध स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत.
मिठाचा शोध स्वाध्याय
प्रश्न १) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) पूर्वीच्या काळी माणूस कोठे राहत असे?
उत्तर- पूर्वीच्या काळी माणूस गुहेमध्ये राहत असे.
आ) आदिमानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टींचे खूप निरीक्षण केले?
उत्तर – आदिमानवाने हरिण ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असलेल्या दगडांना येऊन चाटतात या गोष्टीचे खूप निरीक्षण केले.
इ) खनिज मीठाला आपण काय म्हणतो?
उत्तर- खनिज मीठाला आपण सैंधव मिठ म्हणतो.
इ) माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले?
उत्तर- माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एक खड्डा काढून त्या खड्ड्यामध्ये साठवलं.
प्रश्न २) गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
अ) बरेच दिवस त्याने या गोष्टीचे _______ केलं त्याला खूप आश्चर्य वाटले
बरेच दिवस त्याने या गोष्टीचे निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटले.
आ) कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा ——— चाटू लागला.
आ) कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला.
इ) त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची _______.
त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती.
ई) ते पाणी त्याच्या ________ नेणे त्याला शक्य होत नव्हतं
ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणे त्याला शक्य होत नव्हतं.
प्र ३) का ते सांगा. मिठाचा शोध स्वाध्याय इयत्ता चौथी
अ) आदिमानवाने दगड चाटून पाहिला.
उत्तर- आदिमानवाने काही दिवस निरीक्षण केल्यानंतर हरिण ठरावी एका झाडाच्या बुंध्यापाशी असलेला दगड चाटतानाचे त्याच्या लक्षात आले. कुतूहल म्हणून आदिमानवाने तो दगड चाटून पाहिला.
आ) समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले.
उत्तर- आदिमानवाच्या हातापायावर खरचटून जखमा झाल्या होत्या, म्हणून समुद्राचे क्षारयुक्त पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले.
इ) समुद्रकिनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला.
उत्तर- समुद्रकिनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला कारण त्याला समुद्राचे पाणी खड्ड्यात साठवायचे होते, म्हणून त्याने समुद्रकिनाऱ्यावर लांब खड्डा काढला.
प्रश्न ४) समानार्थी शब्द लिहा.
- जंगल – वन
- झाड – वृक्ष,
- दिवस – दिन,
- समुद्र – सागर,
- पाणी – जल
प्रश्न ५) खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.
निरीक्षण करणे
आदिमानवाने हरणांचे निरीक्षण केले.
कुतूहल वाटणे-
सहलीला जाण्या अगोदर रमेशला त्या ठिकाणाविषयी कुतूहल वाटले.
अंगाला झोंबणे
हिवाळ्यातील थंड हवा अंगाला झोंबते.
प्र ६) मीठ या शब्दासोबत दाखवलेला एक – एक शब्द घेऊन वाक्यप्रचार तयार करा. त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा.
मीठ – जागणे, खडा, जखम, महाग
१) मिठाला जागणे – कृतज्ञ असणे.
माणसाने नेहमी खाल्या मिठाला जागले पाहिजे.
२) मिठाचा खडा पडणे – एखादे काम बिघडणे.
सहलीला गेलेला राजू उलट्या आणि हैराण झाल्यामुळे त्याच्या आनंदात मिठाचा खडा पडला.
३) मिठाला महाग होणे – अत्यंत दारिद्र्य येणे.
दुष्काळामुळे शेतकरी मिठाला महाग झाले.
४) जखमेवर मीठ चोळणे – दुःखात अधिक दुःख देणे.
चोरी झालेल्या रमेशच्या घरी येऊन ताईने त्याच्या जखमेवर मीठ चोळले.
मिठाचा शोध स्वाध्याय हा इयत्ता चौथी च्या पाठ्यपुस्तकातील पाठाखालील आधारित प्रश्नावरील स्वाध्याय आहे. याव्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्या प्रश्नांची उत्तरे लवकरच लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल.
एक अपूर्व सोहळा स्वाध्याय चौथी
Thanks