मातीची सावली स्वाध्याय : स्टॅन्ली गोन्साल्विस या लेखकांनी लिहिलेल्या मातीची सावली या कथासंग्रहातील मातीची सावली ही एक कथा आहे. सदर कथा वाढवली या बोली भाषेत लिहिलेली आहे. आपल्या जमिनीवर प्रेम करणाऱ्या फरशूच्या मनातील विविध भावनांचे वर्णन प्रस्तुत पाठांमध्ये करण्यात आलेले आहे.
मातीची सावली स्वाध्याय स्वरूपामध्ये आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. मातीची सावली पाठावरील प्रश्न उत्तरे नमुना स्वरूपात खालील प्रमाणे आहे. स्वमतामध्ये दिलेली उत्तरे ही नमुना दाखल आहेत. प्रत्येकाच्या विचारानुसार यामध्ये बदल होऊ शकतो.
मातीची सावली स्वाध्याय
प्रश्न १) खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.
अ) मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.
जुन्या घरातील वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते.
आ) आईच्या पदरा सारखी चिंचेची सावली
आईचे पदर म्हणजे माया. बाळाला ज्याप्रमाणे आईचा पदर सुरक्षित व आनंदी ठेवतो त्याप्रमाणे चिंचेच्या झाडाची सावली परसू ला वाटते. .
इ) वरण भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.
चिंचेची पानगळ ही परसुला भिरभिरत येणाऱ्या फुलपाखारच्या थव्यासारखी वाटतात..
प्रश्न २) खालील तक्ता पूर्ण करा.
घटना | परिणाम प्रतिक्रिया |
१) फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसतो. | सुनबाई डापरायची |
२) मनूला फरसुने शिकवले | इंग्रजी नावाच्या कंपनीत कामाला लागला. |
३) वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला | कोसूचे आठ दिवसात निधन झाले. |
४) मनूने जमीन विकायला काढली | फरसुने बैलासारखी मान डोलावली |
प्रश्न ३) आकृती पूर्ण करा. मातीची सावली स्वाध्याय
अ) फरसूच्या वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती –
- झाडाच्या पानापासून खत बनवणे
- चिंचेच्या झाडाचे पान आणि पान गोळा करून तो शेतात पसरायचं
- त्यामुळे शेती कसदार बनायची.
- शेतात एकच वारंवार न घेता वांगी दुधी काढली इत्यादी भाज्यांची दुबार पिके ही तो घ्यायचा.
आ) (मातीची सावली स्वाध्याय) पाठाच्या आधारे फरसुचे खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा.
छंद, फरसू दुःख, मेहनत, माणूसपणा.
उत्तर -फरसू हा आनंदाने आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता. साध्या साध्या गोष्टीतून तो सुख मिळवायचा घराच्या पायरीवर बसायचे. फुलपाखरासारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाने पाहायची. झाडावर चढणाऱ्या खारींचे बागडणे लिहायचे हा त्याचा आवडता छंद.
चिंचेच्या मुळावर बसून चांदण्यात खूप उशिरापर्यंत गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे. परसू मेहनतीत कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे चिंचेचे पान पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवीत स्वतःचे पीक झाले की तेथेच वांगी, दुधी यासारख्या भाज्यांची पीक घेत. फरसु व त्याची बायको हे दोघेही पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची. झाडापानांना उघड्यावर टाकायचे नाही हा त्याचा निर्धार होता. त्याचे दुःख मात्र मोठे होते बिल्डरच्या नादाला लागून घर , शती व झाडे विकली. याचे त्याला खूप दुख झाले. तरीही त्याने आपल्यातील माणूसपण हरवू दिले नाही.
प्रश्न ४) ओघतक्ता तयार करा.
- मनोजची आई प्रार्थना करायची.
- प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचं.
- मनू तर जेवता जेवता उठून नीना सीबलशी मस्ती करायचा.
- घासागणिक पोटात माया उतरायची.
प्रश्न ५) खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
अ) “आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वायीट वाटते.”
उत्तर – आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटते.
आ) “त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय नदी हय नदी.”
उत्तर – त्यांचीच पुण्याई ही विहीर नाही नदी आहे नदी.
मातीची सावली स्वाध्याय इयत्ता नववी | Matichi Savali Prashn uttare
प्रश्न ६) खालील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
अ) टकळी चालवणे –
१) सूत कातणे.
२) सतत बोलणे.
३) वस्त्र विणणे.
उत्तर – टकळी चालवणे – सतत बोलणे.
आ) नाळ तुटणे –
१) मैत्री जमणे.
२) संबंध न राहणे.
३) सबंध जुळणे.
उत्तर – नाळ तुटणे – संबंध न राहणे.
प्रश्न ७) खालील अर्थाची वाक्य पाठातून शोधून लिहा.
अ) फरसूने आपल्या वडिलांचे ऋण व्यक्त केले –
बाप जाद्यांची कमाई रे पोरांनो!
आ) फरसूचा संसार होत्याचं नव्हता झाला
तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्ख बन एका पाऊस वाऱ्यात जमिनीवर झोपावं, तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला.
इ) फरसूचे झाडाबाबतचे प्रेम
पोटच्या पोरा इतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापाण्यांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही, हा निश्चय होता.
प्र.८) स्वमत.
अ) ‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा.
उत्तर-‘ मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार’ या विधानाशी मी सहमत आहे.
माणूस आपल्या इच्छा, आकांक्षा, गरजा पूर्ण करण्यासाठी बऱ्याचदा घराबाहेर परगावी राहतो. बाहेर पडल्यानंतर बऱ्याचदा त्याच्याकडे खूप सारा पैसा आल्याने तो इतरांशी असलेले संबंध कमी करतो. म्हणजेच त्याच्यातील बंधुभाव, प्रेम, आपुलकी या भावना कमी होऊन आपल्या माणसांपासून तो दूर जातो. त्यामुळे त्याच्यातील माणूस पण नष्ट होते. शहरांमध्ये राहताना तो गाव, तेथील माणसे आणि निसर्ग यापासून दूर जातो व त्याची मातीशी असणारी नाळ तुटते. परिणामी त्याच्यातील माणूसपण नष्ट होऊन तो स्वतःसाठी जगायला शिकतो.
आ) पाठात व्यक्त झालेल्या परशुच्या विचाराबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर- पाठात आलेला परसू हा एक कष्टाळू गरीब शेतकरी होता. शेतात दिवस रात्र कष्ट करून आपला उदरनिर्वाह भागवत होता. परसूच्या दृष्टीने पैसा, संपत्ती यापेक्षा मातीशी नाते असण्यातच माणूस पण आहे असे त्याचे मत होते. त्यामुळे जमिनीवर झाडाझुडपांवर पक्षांवर प्राण्यांवर त्याचे जिवापाड प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत जमिनीची सेवा करत जगायचे असा त्याचा निश्चय होत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये आजही शेती बद्दलचा हा विचार दिसून येतो.
शहरीकरणामुळे वाढलेले प्रदूषण, लोकांची ग्रामीण भागाशी तुटलेली नाळ यामुळे माणूसपण हरवत चालले आहे. निसर्गाचा समतोल राखावयाचा असल्यास ग्रामीण जीवन सुरक्षित राहणे खूप आवश्यक आहे. या पाठात आलेले परसूचे विचार हे भविष्य काळातील येणारी संकट दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने अंगीकारणे आवश्यक आहे असे मला वाटते.
भारताचीसुरक्षा व्यवस्था स्वाध्याय
इ) ‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर – मातीचा म्हणजेच जमिनीचा पर्यावरणाशी थेट संबंध असतो. जमिनीचे स्वरूप बदलले तर त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर तर होतोच परंतु त्यासोबतच त्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर त्यांच्या परिणाम होतो. परंपरेवर व त्यांच्या संस्कृतीवर देखील याचा परिणाम होतो.
शहरीकरणामुळे शहराकडे लोकांचे लोंढे वाहत आहेत. घरांची मागणी वाढत आहे. हे पाहून बिल्डरांची हाव वाढली आहे. ते जमिनी घेऊन आहेत नव्या पिढीच्या हे लक्षात येत नाही त्यांना फक्त जमीन विकून मिळालेला पैसा दिसतो.
मातीची सावली स्वाध्याय मध्ये पाठाखालील प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेले आहेत.