महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रियांचे योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा अभ्यास महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या पाठांमध्ये करण्यात आला आहे. इथे आपण महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय अभ्यासणार आहोत.
महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय
प्रश्न १) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
इ.स. 1992 मध्ये …………………….. या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
अ) महाराष्ट्र
ब) गुजरात
क) आंध्र प्रदेश
ड) उत्तराखंड
उत्तर – इ.स. 1992 मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
२) भारत सरकारने 1975 मध्ये……………….. यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
अ) डॉ. फुलरेणू गुहा
ब) उमा भारती
क) वसुंधरा राजे
ड) प्रमिला दंडवते
उत्तर – भारत सरकारने 1975 मध्ये डॉ. फुलेरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
प्रश्न २) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
१) सौदामिनी राव – स्त्रीमुक्ती आंदोलन समिती
२) विद्या बाळ – नारी समता मंच
३) प्रमिला दंडवले – महिला दक्षता समिती
४) ज्योती म्हापसेकर – महिला आयोग
चुकीचे विधान – ज्योती म्हापसेकर – महिला आयोग
बरोबर विधान – ज्योती म्हापसेकर -‘ मुलगी झाली हो’ हे पथनाट्य.
मातीची सावली स्वाध्याय इयत्ता नववी
प्रश्न ३) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१) स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली.
उत्तर – 1975 मध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली. 1978 मध्ये या समितीने लिंगभेद ,जातीभेद या विरोधात संघर्ष करण्याचे जाहीर केले. अनेक महिलांनी नियतकालिके, पथनाट्य, गीत संग्रह, संस्था गट स्थापन करणे असे उपक्रम सुरू केले. स्त्री अत्याचार विरोधी परिषदा घेण्यात आल्या. अनेक पक्षांनी संघटनाने हुंडा स्त्रीभ्रूणहत्या कौटुंबिक अत्याचार या प्रश्नावर संघर्ष केले. स्त्री प्रश्नावर संशोधने सुरू झाली, या सर्व कृतीतूनच स्त्रीमुक्ती चळवळीची सुरुवात झाली.
२) १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.
उत्तर – भारतात १९६१ चा हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असूनही अनेक स्त्रियांचे संशयस्पद मृत्यू घडतच होते. या प्रकारांची चौकशी झाल्यावर या घटना मागे हुंडा हेच कारण असल्याचे उघड होत होते. पोलिसांसह सर्व यंत्रणा हुंडाबंदी कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला पाहिजे. असेच मत देत होते, त्यामुळे स्त्रियांना अधिक संरक्षण देण्यासाठी १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.
३) अस्पृश्यतेच्या रूढी वर कायद्याने बंदी आणली.
उत्तर – भारतात अनेक वर्षे अस्पृश्यता पाळली जात असे. या रुढीमुळे अस्पृश्यांचे जीवन हलाकीचे बनले होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला, हे घटनात्मक अधिकार अस्पृश्य समाजालाही मिळणे आवश्यक होते, म्हणून अस्पृश्यतेची ही रुढी नष्ट करण्यासाठी सरकारने या रूढीवर कायद्याने बंदी आणली.
४) संविधानाने अल्पसंख्या अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहे.
उत्तर -भारतात विविध धर्मांचे, पंथांचे, संस्कृतींचे आणि विविध भाषिक लोक राहतात, यातील अल्पसंख्याक समूहांना आपली संस्कृती परंपरा जपण्याचा आपली भाषा विकसित करण्याचा हक्क असला पाहिजे. आपल्या शिक्षण संस्था स्थापन करता आल्या पाहिजेत यासाठीच संविधानाने अल्पसंख्यांकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.
प्रश्न ४) टीपा लिहा.
१) चिपको आंदोलन
उत्तर – स्त्री शक्तीचा विधायक अविष्कार 1973 च्या चिपको आंदोलनात दिसून आला. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. या विरोधात चंडीप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले. स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षभोवती फेर देण्याचे तंत्र अवलंबले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे, असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला चिपको आंदोलन म्हणतात. आंदोलनात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या परिसरातील कृषी अर्थव्यवस्थेत महिलांचा व्यापक सहभाग होता.
२) मानव अधिकार संरक्षण कायदा
उत्तर – स्त्री-पुरुषावरील अन्याय दूर करण्यासाठी मानव अधिकार संरक्षण कायदा १९९३ मध्ये संमत केला. या कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आणि राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. सामूहिक अत्याचार घटस्फोटीत महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ इत्यादी गोष्टीवर कायद्याने प्रभावी उपाययोजना करून स्त्रिया वरील अन्याय कमी करण्यास मदत केली. स्त्री-पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात या कायद्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली
प्रश्न ५) पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा.
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे पुढील उदाहरणांनी स्पष्ट होते.
- दिवाळीच्या वस्तू बाजारातून गायब झाल्याने त्याविरुद्ध स्त्रियांनी काढलेल्या लाटणे मोर्चाला यश मिळाले.
- हिमालयाच्या पायथ्याशी वृक्षतोडीविरुद्ध महिलांनी चिपको आंदोलन केले. स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याची तंत्र अवलंबले. या आंदोलनात स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता या आंदोलनालाही यश आले होते.
- आंध्र प्रदेशामध्ये महिलांनी मद्यपाना विरुद्ध आंदोलन उभे करून दुकाने बंद पाडल्यामुळे तेथील सरकारला दारूबंदी करावी लागली.
- महिलांनी विभाजन उभारलेल्या हुंडाविरोधी आंदोलनामुळे शासनाला हुंडाबंदी सुधारणा कायदा करावा लागला.