मत्ता व दायित्वे: महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या नियम 19 मधील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही सेवेतील पदावरील त्याच्या प्रथम नियुक्तच्या वेळी व त्यानंतर शासन विहित करेल त्या त्यावेळी विहित नमुन्यांमध्ये त्याचे मत्ता व दायित्व याबाबतचे विवरण सादर करणे बंधनकारक असते. यामध्ये गट ड मधील कर्मचारी वगळले जातात.
मत्ता व दायित्वे म्हणजे काय?
मत्ता या शब्दाचा अर्थ आहे मालमत्ता अथवा संपत्ती. संपत्तीमध्ये दोन प्रकार येतात.
१) चलसंपत्ती व
२) अचल संपत्ती
चल संपत्ती म्हणजे जी संपत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते अशी संपत्ती होय. यामध्ये कर्मचाऱ्याकडे असणारे सोने, चांदी, इतर मौल्यवान धातू, गाड्या इत्यादी मौल्यवान वस्तू यांचा समावेश होतो.
अचल संपत्ती म्हणजे जी संपत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही. या प्रकारच्या संपत्तीमध्ये जमीन, बंगला, शेती इत्यादी प्रकारच्या संपत्तीचा समावेश होता.
दायित्वे म्हणजे कर्मचारी देय असलेली रक्कम. यामध्ये त्याच्यावर असलेले कर्ज अथवा इतर दायित्वाचा समावेश होतो.
मत्ता व दायित्व विवरण पत्रे कोणी द्यावीत?
सर्व निमशासकीय संस्था, पंचायत राज संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, संविधानिक संस्था, महामंडळे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणे सादर करणे आवश्यक असते. यामध्ये गट मधील कर्मचारी वगळले आहेत.
मत्ता व दायित्वे विवरण कधी देतात?
कर्मचाऱ्याने नोकरी लागते वेळी त्याची असणारी संपत्ती समजण्यासाठी दिले जाते व त्यानंतर दरवर्षी शासनाने दिलेल्या विवरणपत्रां मध्ये त्याच्या संपत्तीची माहिती देणे आवश्यक आहे. सदर माहिती गोपनीय ठेवली जाते.
सदर विवरण पत्रे 31 मार्च या तारखे वर आधारित दरवर्षी देतात.