Skip to content

बाह्यप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय इयत्ता 9 वी

  • by
बाह्यप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय इयत्ता 9 वी

बाह्यप्रक्रिया भाग 1 इयत्ता नववीच्या भूगोल पुस्तकातील घटक आहे. बाह्यप्रक्रिया भाग 1 या घटकामध्ये खडकाचे होणारे विदारण, त्याचे प्रकार इत्यादीचा समावेश आहे. या घटकावरील स्वाध्याय आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत.

बाह्यप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय

प्रश्न 1) थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) कायिक विदारण म्हणजे काय ?

उत्तर- खडकाच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकाचे फुटणे, तुटणे, खडकाचे भाग, विलग होणे म्हणजे कायिक विदारण होय.

कायिक विदारण मुख्यता तापमान, दहिवर, स्फटिकांची वाढ, दाबमुक्ती, पाणी या कारणांमुळे घडून येते. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो.

आ) रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते ?

उत्तर – रासायनिक प्रक्रियेमुळे खडकांचे रासायनिक गुणधर्म बदलून त्यांचे नैसर्गिक विघटन होणे म्हणजे रासायनिक विदारण होय.

कार्बनन, द्रवीकरण व भस्मीकरण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार होय.

  • कार्बनन – पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्यादरम्यान त्यात हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड वायु काही प्रमाणात मिसळतो त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होते. अशा आम्लात काही खडक विरघळतात व खडकाचे विदारण होते.
  • द्रवीकरण– मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारांपासून पासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. द्रवीकरणाच्या क्रियेमुळे आशा खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात.
  • भस्मीकरण -ज्या खडकात लोहखनज असते त्या खडकावर क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याची संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यातील रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहाला गंज येतो, त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो व खडकाचे विदारण होते.

इ) जैविक विदारण कसे घडून येते?

उत्तर- मानव, प्राणी व वनस्पती यासारख्या सजीवाकडून होणाऱ्या विदारणास जैविक विदारण म्हणतात. खडकावर वाढणाऱ्या मोठमोठ्या झाडांच्या, मुळ्या जमिनीमध्ये जाताना खडक फुटू लागतात यातून खडकाचे विदारण होते. तसेच उंदीर, घुशी व ससे यासारखे खनक प्राणी व इतर कृमी- किटक जमिनीत बिळे तयार करतात. या बिळांमुळे सुद्धा खडक फुटतात आणि खडकाचे विदारण होते.

४) विदारण व विस्तृत झीज यातील फरक स्पष्ट करा.

विदारणविस्तृत झीज
१) नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकातील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे विदारण होय.१)विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्विय बलाद्वारे झीज होणे या प्रक्रियेला विस्तृत झीज असे
म्हणतात.
२) विदारणाचे कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण असे तीन प्रकार आहेत.२) तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज असे विस्तृत झीजेचे दोन प्रकार आहेत.
बाह्यप्रक्रिया भाग 1

एक होती समई स्वाध्याय इयत्ता 9 वी

प्रश्न २ ) चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.

अ) भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो.

चूक = भूकंपावर प्रामुख्याने भूअंतर्गत हालचालींचा परिणाम होतो.

आ) आद्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते.

बरोबर

इ) शुष्क प्रदेशात कायिक विदाहरण मोठ्या प्रमाणात होते.

बरोबर

ई) खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय.

बरोबर

उ) अपपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते.

चूक= भेसाल्ट खडकाचे भस्मिकरण होऊन जांभा खडकात निर्मिती होते.

प्रश्न ३) खालील ओघ तक्ता पर्ण करा.

बाह्यप्रक्रिया भाग 1
बाह्यप्रक्रिया भाग 1

प्रश्न ४ ) पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.

अ) काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात- जैविक विदारण

आ) खडकातील लोहावर गंज चढतो- रासायनिक विदारण

इ) खडकाच्या तळामध्ये साचलेले पाणी गोठते परिणामी खडक फुटतो – कायिक विदारण

ई) थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात.- कायिक विदारण

उ) ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे. – कायिक विदारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *