बाली बेट स्वाध्याय हा इयत्ता सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पु. ल. देशपांडे लिखित पाठ आहे. या पाठामध्ये लेखकांनी इंडोनेशिया मधील बाली बेट व तेथील निसर्गसृष्टी यांचे वर्णन केले आहे. पु. ल. देशपांडे यांची अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णने आहेत.
बाली बेट स्वाध्याय
प्रश्न १. खालील आकृती पूर्ण करा.
अ) बाली बेटावरील विविध ललितकला
उत्तर: १) गायन २) चित्र ३) शिल्प ४) नृत्य
आ) बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द
उत्तर- रत्नजडित कंठ्यातील कंठमणी
इ) बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द
उत्तर- ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ
प्र. २) बाली बेट स्वाध्याय खालील कल्पना स्पष्ट करा.
अ) बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे.
उत्तर:- एखादा रत्नजडीत कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवताली पसरतात तसेच पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. ज्याप्रमाणे त्या कंठमाण्यात एक महत्वाचा मुख्य कंठमणी असतो, तसेच बाली बेट या बेतामधील एक कंठमणी आहे म्हणून बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे, असे लेखकांनी म्हटले आहे.
(आ) बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे.
उत्तर:- बाली देशाचे पर्यटन खाते हे अतिशय तत्पर आहे. या ठिकाणी असणारे अधिकारी बाली मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतात. म्हणून बाली हा बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात.
इ) ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.
उत्तर- लेखक जेव्हा बालीमधील हॉटेल सागर बीच मध्ये अपरात्री दाखल झाले. तेव्हा एवढ्त्याया अपरात्रीही हॉटेलमधील स्वागत विभागामध्ये काम करणारे चपळ तरुण चेहऱ्यावर जागरणाचा थोडाही ताण न दाखवता त्यांनी स्वागत केले. या प्रसंगावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.
ई) बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती.
उत्तर- सागर बीच हॉटेलची एक सुंदर बाग होती. त्या बागेत माडा फोफळीच्या राया होत्या. या बगीच्यामधून फिरताना जणू काही ती झाडेच कोणी मंडळी आली आहेत म्हणून लेखकांकडे पाहत आहेत असे लेखकांना वाटत होते. फुलांनी बहरलेली रोपटी होती. तेथील फुलबागा भल्या पहाटेही टवटवीत होत्या. अशी त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुलांमाणसांनी, लेकीसुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती.
प्र. ३. खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा.
उत्तर- १) इंडोनेशियातील बेटांच्या समूहामध्ये बाली हे एक सुंदर बेट आहे.
२) बाली बेटावर असणारी घरे व हॉटेल्स ही निसर्गरम्य परिसरात आहेत. झापांची छपरे असलेली घरे या ठिकाणी पाहायला मिळतात.
३) पर्यटनखात्यामध्ये असणारे अधिकारी पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत करतात.आवश्यक सेवा पुरवतात.
४) समुद्रकिनारी हॉटेलमध्ये गर्द बगिचा आहे. या बगीच्यात माड आणि पोफळीं यासारखी इतर अनेक झाडे आहेत.
५) सध्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या बेटाची माहिती दूरवर पोहचवली जात आहे.
प्र. ४. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
अ) पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात.
उत्तर- झोपेत रात्री स्वप्ने पडतात. या स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नानाची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते.
आ) पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली.
उत्तर- लेखक हॉटेल वर अपरात्री पोहचल्यावरही तेथे त्यांचे स्वागत झाले. त्यांना खोली दाखवली. हॉटेल मधील खोलीत प्रवेश करताच ते थकलेले असल्याने ते पाचच मिनिटांत गाढ झोपी गेले म्हणून पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली असे लेखक म्हणतात.
इ) वेलींचेही अंगधुणे झाले होते.
उत्तर- सागर बीच हॉटेलची बाग खूप सुंदर होती. या बागेमध्ये असणाऱ्या वेली या सकाळी पडणाऱ्या दवामुळे ओल्याचिंब झाल्या होत्या जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. म्हणून लेखक वेलींचेही अगधुणे झाले होते असे म्हणतात.
ई) त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो.
उत्तर- पूर्वी राजदरबारी गायक असत, त्यांना भाट असे म्हटले जात होते. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट आहेत. पाहटे पक्षांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही, म्हणून लेखक स्वतःच गाऊ लागते. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली.
प्र.५) खेळूया शब्दांशी. (बाली बेट स्वाध्याय)
अ) खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या.
अ) टुरिस्टांचा स्वर्ग
उत्तर- तेथे जाणाऱ्या लोकांसाठी बाली बेट हे अत्यंत आनंददायी, निसर्गरम्य असल्याने त्याला टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे.
आ) किर्र जंगल
उत्तर: खूप घनदाट जंगल.
इ) अश्राप माणसे.
उत्तर: अतिशय भोळीभाबडी माणसे.
ई) गाणारे भाट
उत्तर- भाट याचाअर्थ राजाची स्तुती करणारे राजदरबारी असणारे गायक पण याठिकाणी हा शब्द पक्षांसाठी आला आहे.
उ) तंबूतला सिनेमा.
उत्तर- पूर्वी गावोगावी तंबू ठोकून त्यामध्ये सिनेमा दाखवणे.
आ) खालील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा.
अ) अभंग-
1) अभंग एक मराठी छंद प्रकार
२) काधीही न भंगणारे
आ) बोट-
१) होडी
२) हाताचे बोट (अवयव)
इ) खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
१) उभयता
उत्तर: लग्नात आलेल्या पाहुण्यांना उभायाताना आशीर्वाद दिले.
(२) यत्किंचितही
उत्तर: तानाजी मालुसरे यत्किंचितही विचार न महाराजांसाठी मुलाचे लग्न मागे ठेऊन कोन्धाण्याच्या स्वारीवर गेले. .
(३) चौघडा
उत्तर: लग्नात सनई- चौघडा वाजवला जातो.
(४) चित्रविचित्र
उत्तर: खेळणारी मुले चित्रविचित्र आवाज काढत होती.
बाली बेट स्वाध्याय नमुना प्रश्न उत्तरे देण्यात आली आहेत.
Good teacher that you are so beautiful