Skip to content

 पृथ्वीवरील सजीव स्वाध्याय 5 वी

  • by
पृथ्वीवरील सजीव

पृथ्वीवरील सजीव हा इयत्ता पाचवीच्या आपण असे घडलो ( इतिहास ) या पाठ्यपुस्तकातील घटक आहे. या पाठामध्ये पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती व पृथ्वीवरील प्राणीसृष्टी या विषयाच थोडक्यात माहिती दिली आहे. सूर्यमालेची निर्मिती साधारणता सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली असावी असे संशोधकांचे मत आहे.

आपल्या सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ,गुरू, शनि, युरेनस वन नेपच्यून असे एकूण आठ ग्रह आहेत. आज पर्यंतच्या संशोधनानुसार फक्त पृथ्वी या ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण झाली आहे. पृथ्वी खेरीज मंगळ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांना वाटत आहे मात्र त्याविषयीचे निश्चित तज्ञ अजून पुढे आलेले नाही. पृथ्वीवरील पहिला सजीव निर्माण होण्यासाठी जवळ जवळ 80 कोटी वर्षे लागली. हा पहिला एक पेशीय सजीव पाण्यामध्ये तयार झाला. पृथ्वीवरील सजीव या पाठावरील स्वाध्याय पाहूया.

पृथ्वीवरील सजीव

प्र १) पृथ्वीवरील सजीव या पाठाच्या आधारे पुढील घटना कालानुक्रमे लिहा.

१) पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली.

२) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.

३) अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले.

४) अतितप्त वायू आणि धुळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला.

उत्तर :

१) अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला.

२) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.

३) पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली.

४) अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले.

प्र २) पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते?

एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते.

२) अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव प्रथम कोठे निर्माण झाले ?

अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव प्रथम पाण्यामध्ये निर्माण झाले.

बंडूची इजार स्वाध्याय 5 वी

प्र ३) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१) सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले ?

सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान व चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले. विभाजनामुळे त्याचे अनेक तुकडे झाले. या विभाजनातून सूर्य व त्याच्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.

२) प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा.

प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१) प्राणी श्वासोच्छवास करतात.

२) प्राणी अन्न मिळवण्यासाठी व अन्य कारणांसाठी हालचाल करतात.

३) काही प्राणी अपत्याला जन्म देतात; तर काही प्राणी अंडी घालून पिल्लांना जन्म देतात.

४) प्राणी हालचाल करतात.

३) पुढील चौकटीत लपलेल पाच ग्रहांची नावे शोधून लिहा.

पृथ्वीवरील सजीव

उत्तर- १) शुक्र, २) युरेनस, ३) नेपच्यून, ४) प्लुटो ५) मंगळ

अलंकारिक शब्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *