त्रिकोणी संख्या ऑनलाईन टेस्ट : त्रिकोणी संख्या हा गणितातील एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर आधारित निरनिराळे स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. या पोस्टमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय? त्रिकोणी संख्येबाबत विचारले जाणारे प्रश्न अभ्यासणार आहोत. त्यानंतर त्रिकोणी संख्या ऑनलाईन टेस्ट आपणास सोडवता येईल.
त्रिकोणी संख्या म्हणजे काय?
ज्या समान अंतरावरील बिंदूंच्या रचनेद्वारे समभुज त्रिकोण तयार करता येईल अशी मांडणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बिंदूंची संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या होय.
त्रिकोणी संख्येवर आधारित प्रश्न
- एक ते शंभर मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत?
एक ते शंभर मध्ये एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. 1, 3, 6, 10,15, 21, 28 36, 45, 55, 66, 78, 91
- सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती?
सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे.
- किती त्रिकोणी संख्या मूळ आहेत? त्या कोणत्या?
फक्त 3 ही एकमेव त्रिकोणी संख्या मूळ आहे. उर्वरित सर्व त्रिकोणी संख्या संयुक्त संख्या आहेत.
त्रिकोणी संख्या ऑनलाईन टेस्ट | Triangular Numbers Online Test for Scholarship exam
ऑनलाईन चाचणी सोडवण्याबाबत सूचना-
- या चाचणीमध्ये एकूण दहा प्रश्न आहेत. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.
- चाचणी सोडवत असताना आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देण्याची आवश्यकता नाही.
- एखाद्या प्रश्न सोडवायचा राहिल्यास चाचणी सबमिट होत नाही.
- चाचणी सबमिट केल्यानंतर View Score मध्ये जाऊन आपण आपले प्रश्न तपासू शकता. यामध्ये आपले कोणते प्रश्न बरोबर आहे व कोणते चूक आहेत हे लक्षात येईल.
- ही चाचणी नवोदय परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी करिता उपयुक्त आहे. त्याचबरोबर यापेक्षा वेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक महत्त्वाचा आहे.
- सदर चाचणी आपण कितीही वेळा सोडवू शकता.