Skip to content

झुळूक मी व्हावे स्वाध्याय इयत्ता चौथी

  • by
झुळूक मी व्हावे स्वाध्याय

झुळूक मी व्हावे स्वाध्याय : झुळूक मी व्हावे ही कविता इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील असून या कवितेचे कवी आहेत दा. अ. कारे.

या कवितेमध्ये कवी सानुली वाऱ्याची झुळूक होऊन आपले मन ओढ येईल तिकडे मुक्तपणे फिरणार आहे. ते कधी बाजारात जाईल तर कधी नदीच्या काठी जाणार आहे. कधी राईत म्हणजेच आंब्याच्या बागेत तर कधी पडक्या वाड्यासाठी जाणार आहे. कधी रमत गमत तर कधी न थांबता भरारी थेट मारून जायचं आहे. अशा प्रकारे निरनिराळ्या ठिकाणी मुक्तपणे कवीला भटकायचे आहे.

झुळूक मी व्हावे स्वाध्याय या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत.

झुळूक मी व्हावे स्वाध्याय

प्रश्न १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) कवीला काय व्हावेसे वाटते?

कवीला एखादी मंद झुळूक व्हावी असे वाटते.

२) कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते?

कळीला हळुवारपणे बोट लावावे, असे कवीला वाटते.

३) दिशा दिशांतून कवी काय उधळून देतो?

दिशा दिशांतून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो.

४) कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे?

उत्तर- कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे.

प्र.२) खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा.

अ) जिकडे मन आकर्षिले जाईल, तिकडे अगदी मोकळेपणाने जावे.

उत्तर- घेईल ओढ मन तिकडे सोयरे झुकावे.

आ) जाता जाता सुगंध उधळत जावे.

उत्तर- परि जाता जाता सुगंध संगे न्यावा,

तो दिशादिशातून फिरता उधळूनि द्यावा.

) झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे.

उत्तर- झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर.

ई) हिरव्यागार शेतात किंवा निळ्याशार नदीच्या काठावर जावे.

उत्तर- शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत

खुलवित मखमली तरंग जावे गात.

प्र. ३) कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा.

( पसार झाले, झुकली, कानोसा घेतला, भरारी घेतली)

१) घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला.

२) मांजरीला पाहून उंदीर पसार झाले.

३) नदीच्या पाण्यात झाडाची फांदी झुकली.

४) पक्षाने आकाशात भरारी घेतली.

प्र.४) रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा.

वाटते मला सानूला पक्षी मी व्हावे

घेईल ओढ मन तिकडे उडत जावे

कधी आकाशी तर कधी समुद्राकाठी

जमिनीवर कधी वा उंच डोंगराच्या पाठी.

प्र.५) अनेक वचन लिहा.

  • नदी – नद्या
  • शेत – शेती
  • झरा – झरे
  • दिशा – दिशा

झुळूक मी व्हावे स्वाध्याय

शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय चौथी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *