उदाहरण संग्रह 33 : इयत्ता पाचवीच्या गणित पाठ्यपुस्तकातील विभाज्य आणि विभाजक हा एक घटक आहे. या घटकामधील विभाजक या घटकावर उदाहरण संग्रह 33 या ठिकाणी अभ्यासणार आहोत.
विभाजक म्हणजे काय?
एखाद्या संख्येला ज्या संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला विभाजक अथवा अवयव असे म्हणतात. म्हणजेच ज्या संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येने विभाजक म्हणतात तर ज्या संख्येला पूर्ण भाग जातो त्या संख्येला विभाज्य असे म्हणतात. विभाजकांना अवयव असेही म्हणतात.
उदाहरण संग्रह 32
प्र 1) खालील संख्यांचे विभाजक लिहा.
- 8= 1, 2, 4, 8
- 5 = 1, 5
- 14= 1, 2, 7, 14
- 10= 1, 2, 5, 10
- 7= 1, 7
- 22= 1, 2, 11, 22
- 25= 1, 5, 25
- 32= 1, 2, 4, 8, 16, 32
- 33= 1, 11, 33
उदाहरण संग्रह 33
- 1. 2 ने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा.
उत्तर – 534, 680, 622, 946, 306.
एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक असणाऱ्या संख्येस 2 ने निशेष भाग जातो.
5) 5 ने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा.
उत्तर- 450, 985, 855, 950, 695
5 ची कसोटी- ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असतो त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो.
3) 10 ने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा.
उत्तर – 560, 200, 950, 410, 890
10 ची कसोटी – ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो.
प्र 2) 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा.
उत्तर – 546, 9414, 5442, 696, 1236
प्र. 3) 3 मीटर लांबीची एक रिबन आहे. तिचे असे तुकडे करता येतील का, की प्रत्येक तुकडा 50 सेमी लांबीचा असेल? कारण लिहा.
उत्तर – 3 मीटर म्हणजे 300 सेमी
तीन मीटरच्या 50 सेमी लांबीचे 6 तुकडे होतील. 50 सेमी लांबीचे तुकडे करता येतील कारण 50 ही संख्या 300 चा विभाजक आहे.
प्र 4) 3 मीटर लांबीची एक रिबन आहे. रिबन चे 40 सेमी लांबीचे आठ तुकडे हवे आहेत. तर त्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल.
3 मीटर = 300 सेमी
40 सेमीचे 8 तुकडे म्हणजे 40 x 8= 320 सेमी रिबन लागेल.
आठ तुकडे करण्यासाठी 20 सेमी लांबीची रिबन कमी पडेल.
प्र. 5) खालील सारणीत दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निशेष भाग जात असल्यास ‘✓’ अशी खूण करा व भाग जात नसल्यास ‘X’ अशी खूण करा.
संख्या/भाजक | 2 | 5 | 10 |
15 | X | ✓ | ✓ |
30 | ✓ | ✓ | ✓ |
34 | ✓ | X | X |
46 | ✓ | X | X |
संख्या/भाजक | 2 | 5 | 10 |
55 | X | ✓ | X |
63 | X | X | X |
70 | ✓ | ✓ | ✓ |
84 | ✓ | X | X |
संख्या | विभाजक |
2 | 1, 2 |
3 | 1, 3 |
4 | 1, 2, 4 |
5 | 1, 5 |
6 | 1, 2, 3, 6 |
11 | 1, 11 |
12 | 1, 2, 3, 4, 6, 12 |
16 | 1, 2, 4, 8, 16 |
19 | 1, 19 |
25 | 1, 5, 25 |