Skip to content

आनंदाचे झाड स्वाध्याय इयत्ता 4 थी

  • by
आनंदाचे झाड स्वाध्याय

आनंदाचे झाड स्वाध्याय : आनंदाचे झाड या पाठाचे लेखिका आहेत लीला शिंदे. शेवगा या झाडाचे उपयोग व त्याबाबत असणाऱ्या अंधश्रद्धा याबाबतची माहिती या पाठातून मिळते. आनंदाचे झाड स्वाध्याय प्रश्न उत्तरे या ठिकाणी अभ्यासणार आहोत.

आनंदाचे झाड स्वाध्याय

प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते?

शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस लंबत होते.

२) हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असेल?

हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत असे.

३) पशुपक्षी, कीटक – किड्यांचे माहेर कोणते?

पशुपक्षी कीटक किड्यांचे ‘आमचा शेवगा ‘ हे माहेर होते.

प्र २) तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा. आनंदाचे झाड स्वाध्याय

१) झाडे आपल्याला काय काय देतात?

झाडे आपल्याला फळे, फुले देतात. सावली देतात. पक्ष्यांना घर देतात. आधार देतात. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. झाडांमुळे पाऊस पडतो.

२) शेवग्यामुळे लेखिकेला पक्षांच्या कोणकोणत्या गोष्टींची ओळख झाली?

शेवग्यामुळे लेखिकेला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार ; देखणे, मोहक रंग, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या इ. गोष्टींची ओळख झाली.

३) लेखिकेला शेवग्याने काय काय दिले?

शेवगा लेखिकेचा आवडता मित्र झाला. ज्ञान व आनंद दिला. कितीतरी पक्ष्यांची, किड्यांची व कीटकांची ओळख करून दिली. शेवग्याच्या रंगाने व फुलोऱ्याने लेखिकेला नवीन उत्साह दिला.

प्र ३) कोण, कोणास म्हणाले?

१) “दारात कधीही शेवगा लावू नये. घरात भांडण होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका.

“शेजारच्या काकू लेखिकेला व तिच्या आईला म्हणाल्या.

२) “मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही.

“लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली.

३) “अहो, लोक शेंगा तोडून नेतील, तेव्हा नाही का भांडणार तुम्ही ?

“शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या.

आनंदाचे झाड स्वाध्याय इयत्ता चौथी

प्र ४) गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.

१) हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता.

२) अलगत हवेत तरंगत येवल्या इवल्या चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली.

३) वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा आहे.

प्र ५) शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठात आली आहेत. त्यांची यादी करा.

१) मधमाशा २) फुलचुख्या ३) तांबट ४) कोकीळ ५) राघू ६) बुलबुल ७) चिमण्या ८) साळुंक्या ९) खंड्या

प्र ६) ‘कार’ प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा.उदा., गीत – गीतकार.

  • संगीत – संगीतकार.
  • चित्र – चित्रकार.
  • नाटक – नाटककार
  • कला – कलाकार

७) खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.

१) परोपकार करणे:- साधू संत परोपकारी असतात.

२) आधार देणे:- अनाथ आश्रमात अनाथांना आधार देतात.

३) फस्त करणे:- आईने केलेला खाऊ राजुने फस्त केला.

४) रुंजी घालणे:– बागेतल्या फुलांभोवती फुलपाखरू रुंजी घालत होते.

५) सुळकी मारणे:– राजूने विहिरीच्या पाण्यात उंचावरून सुळकी मारली.

६) पाळत ठेवणे:– बाबांनी राजूवर पाळत ठेवली.

प्र ८) शेवग्याच्या शेंगापासून कोणकोणते पदार्थ बनतात? त्यातल्या कोणत्याही एका पदार्थाची कृती आई बाबांना विचारून लिहा.

१) भाजी 2) आमटी 3) सांबर

शेवग्याची आमटी कशी बनवतात?

कृती – शेवग्याच्या शेंगांचे तीन-चार इंचाचे तुकडे करून घ्यावेत. नंतर त्याच्या वरील थोड्या थोड्या साली काढून घ्याव्यात. नंतर स्वच्छ धुऊन घ्यावे. तुरीची डाळ अथवा इतर डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी. नंतर पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये थोडा कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा.

शेवग्याच्या शेंगा व तुरीची डाळ त्यामध्ये टाकावे. थोडे तिखट,हळद टाकावे. चवीप्रमाणे चिमूटभर मीठ टाकावे. त्याचबरोबर आवश्यक असल्यास आपल्या आवडीनुसार इतर मसाले टाकू शकता. नंतर गरजे इतके पाणी ओतावे. नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालावे. कोथिंबीर घालावी. आमटी चांगली शिजू द्यावी. त्यांनतर जेवण्यास घ्यावी.

मिठाचा शोध स्वाध्याय इयत्ता चौथी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *