Skip to content

वाहतूक स्वाध्याय इयत्ता पाचवी | Vahatuk Prashn uttare 5 th

  • by
वाहतूक स्वाध्याय इयत्ता पाचवी

वाहतूक स्वाध्याय : वाहतूक हा इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास एक पाठ्यपुस्तकातील घटक आहे. वाहतुकीचे आपल्यावर होणारे चांगले आणि वाईट परिणाम या पाठामध्ये मांडण्यात आले आहेत.

वाहतुकीच्या साधनांचा विचारपूर्वक वापर करणे आज आवश्यक आहे. वाहनांचा वाढता अनावश्यक वापर प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. वाहतूक साधनांच्या प्रदूषणामुळे निसर्गाचे अस्तित्व धोक्यात येत चालले आहे.

या पाठाच्या आधारे वाहतूक व त्यामुळे होणारे प्रदूषण व प्रदूषणावरचे उपाय समजतात. या ठिकाणी आपण वाहतूक स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत.

वाहतूक स्वाध्याय

१) वाहतुकीच्या सोयीचा तुम्हांला झालेला फायदा, यावर पाच वाक्ये लिहा.
उत्तर:- वाहतुकीच्या सोईमुळे मला झालेला फायदे खालील प्रमाणे आहेत.

  • वाहतुकीच्या सोयीमुळे कोणतीही वस्तू मला माझ्या गावात किंवा जवळच्या शहरात मिळू लागली.
  • माझ्या दादाला वाहतुकीच्या सोयीमुळे शहरातील शाळेला जाणे शक्य झाले आहे.
  • आमच्या शेतात तयार होणारा माल विक्रीसाठी बाहेर घेऊन जाणे सोपे झाले.
  • माझ्या घरासाठी लागणारे साहित्य यामध्ये चिरा, वाळू, खडी लवकर उपलब्ध होऊ लागली.
  • पाहुण्यांकडे, मित्र-मैत्रिणीकडे कार्यक्रमासाठी जाणे सोपे झाले.
  • वाहतुकीच्या सोयीमुळे निरनिराळ्या पर्यटन स्थळांना भेटी देणे सोपे झाले आहे.
  • रात्री अपरात्री कोणी आजारी पडल्यास, कोणते संकट आल्यास कमी वेळामध्ये दवाखान्यामध्ये जाता येते.

२) वाहतुकीच्या सोईमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या चार सुविधा लिहा.
उत्तर: वाहतुकीच्या सोईमुळे परिसरात पुढील सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

  • विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी जाता आले.
  • व्यापाराला चालना मिळाली. शेतीमालाला निरनिराळ्या बाजारपेठा निर्माण झाल्या.
  • पर्यटन स्थळे विकसित झाली. पर्यटन स्थळा जवळील लोकांना रोजगार उपलब्ध झाला.
  • आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्या.

३) आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी चार उपाय लिहा.
उत्तर: परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पुढील उपाय करता येतील.

  • वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी शक्य असेल त्या ठिकाणी पायी चालत जावे. जवळच्या प्रवासात कारचा उपयोग न करता सायकल, मोटरसायकल अथवा पायी जाण्याला प्राधान्य द्यावे.
  • शक्य असेल तिथे खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी कमी होईल.
  • रस्त्यावर प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
  • एकाच ठिकाणी काम करत असलेल्या लोकांनी कामावर जाताना वेगवेगळ्या गाड्या न वापरता सर्वांसाठी एकच गाडी वापरावी जेणेकरून त्यांची आर्थिक बचत होईल व वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

४) तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोध. हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा?
उत्तर:- डोंगर व जंगलाचा भाग असलेला आमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषित असलेला भाग आहे.

या भागाचे प्रदूषण कमी असण्यामागची कारणे खालील प्रमाणे आहेत.

  • डोंगर व जंगलाचा भाग असणाऱ्या भागांमध्ये लोकवस्तीचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे अशा ठिकाणी प्रदूषण करणारे घटकही कमी असतात.
  • या भागामध्ये वाहनांची वर्दळ कमी असते. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण झाडांमुळे चांगले असते.
  • मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असल्यामुळे येथील हवेत कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण कमी असते.
  • कारखाने, वाहतुकीच्या सुविधा नसतात.

वाहतूक स्वाध्याय इयत्ता पाचवी

५) CNG व LPG ची विस्तारित रूपे लिहा.
उत्तर: CNG व LPG ची विस्तारित रूपे :

CNG: Compressed Natural Gas.

LPG: Liquefied Pertolium Gas.

वाहतूक स्वाध्याय इयत्ता पाचवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *